जनतेला धान्याऐवजी मिळणार पीठ ः महसूलमंत्री थोरात

बई -  करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्य लॉकडाऊन करण्यात आले आले आहे. त्यामुळे रोजच्या रोजगारांवर पोट भरणार्‍या अनेक कामगारांसमोर रोजच्या जेवणाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी काळजी घेत असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. 
महाराष्ट्रातील जनतेला धान्याऐवजी थेट पीठ कसे मिळेल याबाबत सूक्ष्म स्तरावर नियोजन सुरु असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्यातील जनतेसाठी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. थोरात यांनी सांगितले की, संपूर्ण लॉकडाऊनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. तसंच, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना अडवू नका अशा सूचना आम्ही राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून ही वाहतूक सुरळीत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण लॉकडाउनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही ही सूक्ष्म स्तरावर नियोजन सुरू आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान शेतीच्या कामांवर परिणाम होऊ नये यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. याबाबत बाळासाहेब थोरातांनी सांगितले की, ’शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नाही. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून हार्वेस्टिंग मशीन येथे आले आहेत. त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल. तशा सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनला इंधन दिले जाईल, असे थोरातांनी सांगितले. दरम्यान, कोरोनामुक्तीनंतरच रेडीरेकनर दर जाहीर करण्यात येतील, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले. दरवर्षी मार्चअखेरीस सरकारकडून रेडीरेकनर दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या 15 दिवसांपासून महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नाहीत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर हे दर जाहीर करण्यात येतील, असे देखील बाळासाहेब थोरातांनी सांगितले.



चौकट . . .
करोनाचे संकट दूर झाल्यावर रेडीरेकनर दर जाहीर होणार
सरकारकडून दर वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नसून कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.


Popular posts
त्या कोरोना बाधित महिलेची प्रकृती स्थिर, 60 संशयितांचे स्वॅब सॅम्पल तपासणीसाठी पाठवले; दु:खी नगर परिसर सील
कोरोनाग्रस्त होऊन हॉस्पिटल क्वारेंटाइन होण्यापेक्षा होम क्वारेंटाइन व्हा, अजित पवारांचा राज्यातील जनतेला सल्ला
Image
देशातील काही विमा कंपन्या देत आहेत कोरोनािवरुद्ध आरोग्य संरक्षण, या ४ प्रकारे तुम्ही घेऊ शकता पॉलिसी
Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी रस्त्यावर! २५ जणांचा अहवाल निगेटिव्ह ; ७८ जणांचे अहवाल येणे बाकी