देशातील काही विमा कंपन्या देत आहेत कोरोनािवरुद्ध आरोग्य संरक्षण, या ४ प्रकारे तुम्ही घेऊ शकता पॉलिसी


मुंबई. विनोद यादव कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता आपली आरोग्य विमा पॉलिसी कोरोना संसर्ग कव्हर करते की नाही? असा संभ्रम देशातील लोकांत आहे. खरे तर विमा कंपन्या अशा महामारीला क्लेमच्या बाहेर ठेवतात. अशा स्थितीत सर्वसामान्यांना आरोग्य विमा पॉलिसीद्वारे कोरोनाशी सामना कसा करता येईल याबद्दल ‘दैनिक भास्कर’ने जाणून घेतले. कोरोना विम्याबाबत देशात स्थिती काय आहे आणि तो कसा मिळवावा ते वाचा -


ज्यांच्याकडे पॉलिसी आहे त्यांच्यासाठी अॅड ऑन रायडर


ट्रिनिटी री-इन्शुरन्स ब्रोकरचे प्रमुख अखिलेश जैन सांगतात की, जुनी अर्थात सुरू असलेल्या पॉलिसीवर आता काही कंपन्यांनी नवे अॅड ऑन रायडर देण्यात सुरू केले आहे.जसे -एक खासगी कंपनी २९९ रु. किंवा तशा प्रकारे वन टाइम पेमेंटवर कोविड-१९ झाल्यावर २ लाखांपर्यंतचा विमा देत आहेत.


विशेष कोरोना पॉलिसीत मिळेल तीन लाखांचे संरक्षण


फ्यूचर जनरली इंडिया इन्शुरन्सचे प्रमुख सीओओ डॉ. श्रीराज देशपांडे सांगतात की, त्यांच्या कंपनीने विशेष कोरोना विषाणू समूह विमा पॉलिसी तयार केली आहे. त्यात एक दिवसाच्या नवजात बालकापासून ते ७५ वर्षांच्या वृद्धांना तीन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.


१९९ रु.च्या पॉलिसीत २५ हजार रुपयांचे विमा संरक्षण


आयसीआयसीआय लोम्बार्डने भारतपे सोबत १८ ते ६५ वर्षांच्या लोकांसाठी १९९ रु.त कोविड-१९ संरक्षण विमा पॉलिसी लाँच केली आहे. भारतपेचे सीईओ अषनीर ग्रोवर सांगतात की, ४० लाखांहून जास्त व्यापारी भारतपे वापरतात. ही एक हजारांहून जास्त व्यापाऱ्यांनी घेतली आहे.


पाच दिवस जुनी पॉलिसी, २९ कंपन्या देताहेत कोरोना कव्हर


एक एप्रिलला आरोग्य संजीवनी पॉलिसी सुरू झाली. इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडियचे सचिव विजय रामपाल सांगतात की,प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगवेगळी असते. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी एक स्टँडर्ड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सुरू करण्यात आली आहे. विमा नियामक व विकास प्राधिकरणाने २९ विमा कंपन्यांना आरोग्य संजीवनीअंतर्गत कोरोनाबाधितांना एक ते पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. यात लाखामागे सुमारे एक हजार रुपयांचा प्रीमियम भरावा लागतो.


Popular posts
त्या कोरोना बाधित महिलेची प्रकृती स्थिर, 60 संशयितांचे स्वॅब सॅम्पल तपासणीसाठी पाठवले; दु:खी नगर परिसर सील
कोरोनाग्रस्त होऊन हॉस्पिटल क्वारेंटाइन होण्यापेक्षा होम क्वारेंटाइन व्हा, अजित पवारांचा राज्यातील जनतेला सल्ला
Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी रस्त्यावर! २५ जणांचा अहवाल निगेटिव्ह ; ७८ जणांचे अहवाल येणे बाकी
जनतेला धान्याऐवजी मिळणार पीठ ः महसूलमंत्री थोरात