दूरदर्शनवर 'भारत एक खोज' आणि 'संविधान' यांसारख्या मालिका प्रसारित कराव्यात, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी


मु्ंबई. मुंबई - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लॉकडाउन दरम्यान श्याम बेनेगल दिग्दर्शित 'भारत एक खोज' आणि 'संविधान' या मालिका दूरदर्शनवर प्रसारित कराव्यात अशी विनंती केंद्राला केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे ही विनंती केली आहे. तसेच चव्हाण यांनी दूरदर्शनवरील "रामायण", "महाभारत" आणि "शक्तीमान" सारख्या लोकप्रिय जुन्या कार्यक्रमांचे प्रसारण करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.


आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीपट आणि मालिकांचे प्रसारण करावे


चव्हाण यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'भारत एक खोज' आणि 'संविधान' मालिका आपल्या इतिहासाबद्दल आणि राज्यघटनेबाबत उत्सुकता वाढवण्यास मदत करतील. सोबतच मंत्रालयाने कार्ल सॅगन यांची 'कॉसमॉस' (1980) आणि नील दिग्रेस टायसन यांची 'कॉसमॉस : अ स्पेसटाइम ओडिसी' (2014) यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञान माहितीपट आणि मालिका दूरदर्शनवर प्रसारित कराव्यात.


ते म्हणाले की, 'इतरही अनेक उच्च प्रतीच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक लघुपट आणि टीव्ही मालिका आहेत. आपण सध्या ज्या परिस्थितीत आहोत त्या लक्षात घेता या कमी शुल्कात प्राप्त होऊ शकतील.


Popular posts
त्या कोरोना बाधित महिलेची प्रकृती स्थिर, 60 संशयितांचे स्वॅब सॅम्पल तपासणीसाठी पाठवले; दु:खी नगर परिसर सील
कोरोनाग्रस्त होऊन हॉस्पिटल क्वारेंटाइन होण्यापेक्षा होम क्वारेंटाइन व्हा, अजित पवारांचा राज्यातील जनतेला सल्ला
Image
देशातील काही विमा कंपन्या देत आहेत कोरोनािवरुद्ध आरोग्य संरक्षण, या ४ प्रकारे तुम्ही घेऊ शकता पॉलिसी
Image
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी रस्त्यावर! २५ जणांचा अहवाल निगेटिव्ह ; ७८ जणांचे अहवाल येणे बाकी
जनतेला धान्याऐवजी मिळणार पीठ ः महसूलमंत्री थोरात